पणजी : गोव्यामध्ये फेरी धक्क्यावर पार्क केलेली स्विफ्ट कार पाण्यात बुडल्याचं पाहायला मिळालं. सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी खेचून ही गाडी बाहेर काढली.


राजधानी पणजीतील फेरी धक्क्यावर पार्क करुन ठेवलेली स्विफ्ट गाडी मांडवी नदीत वाहत गेली. मंगळवारी पहाटे अडीच वाजताच्या सुमारास पाण्यासोबत कार नदीत गेली.

शेजारील लोकांच्या नजरेस ही घटना येताच पोलिस आणि अग्निशामक दलाच्या जवानांना याची माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी सव्वा तीन वाजता पाण्यात गेलेली कार खेचून बाहेर काढण्यात यश मिळवलं. त्यानंतर कारच्या मालकाला बोलावून कार त्याच्याकडे सोपवण्यात आली.

मांडवी नदीतून कॅसिनोचे ग्राहक आणि कर्मचारी ये-जा करत असतात. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत या भागात वर्दळ सुरु असते. त्यामुळे कार बुडत असल्याचं लक्षात आलं. त्यामुळे कार वाचवणं शक्य झालं. अन्यथा कार नदीत बुडाली असती.