पणजी : गोव्यातील भाकड गाय आणि वृद्ध बैलांच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्याने, त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला घेतला आहे. भाकड गाय आणि वृद्ध बैलांच्या देखभालीसाठी राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
येत्या 2 ते 3 महिन्यात ही योजना तयार केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज विधानसभेत दिली.
मुख्यमंत्री पर्रिकर म्हणाले, '' भाकड गाय आणि वृद्ध बैलांची देखभाल परवडणारी नाही, याची आपल्याला कल्पना असून, अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणारी योजना सरकारच्या विचाराधीन आहे. येत्या 2 ते 3 महिन्यात ही योजना तयार केली जाणार आहे. या योजनेमुळे वृद्ध जनावरे कत्तलखान्यात देण्याचे प्रकार थांबतील,'' अशी आपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. त्यातच काँग्रेस नेते प्रताप सिंह राणा यांनी याबाबतचा मुद्दा संसदेत मांडला होता. भाकड तथा वृद्ध गायींची देखभाल शेतकऱ्याने कशी करावी? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला होता. त्यावर मनोहर पर्रिकरांनी विधानसभेत आपली भूमिका स्पष्ट केली.
सध्या गोव्यात 1978 मधील कायद्याद्वारे गोवंश विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे भाकड गायींचा सांभाळ करणे, शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही.
भाकड गायींच्या देखभालीसाठी गोवा सरकार आर्थिक मदत देणार!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Jul 2017 02:50 PM (IST)
गोव्यातील भाकड गाय आणि वृद्ध बैलांच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्याने, त्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने घेतला घेतला आहे. भाकड गाय आणि वृद्ध बैलांच्या देखभालीसाठी राज्य सरकारतर्फे शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -