अधिकाऱ्यांनी संशयानेच कमरपट्टा फाडला असता त्यात पावडरच्या स्वरुपात सोनं आढळून आलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी हा ऐवज जप्त केला. चौकशीत हे सोने 929 ग्रॅम वजनाचे असल्याचे आढळून आले. अधिकाऱ्यांनी या कमरपट्ट्याबद्दल चौकशी करताना प्रवाशांना विचारले असता, कोणीच या कमरपट्ट्यावर दावा केला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना संशयित प्रवाशाला ताब्यात घेणं शक्य झालं नाही.
गोवा कस्टम विभागाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत 26 लाखांहून अधिक आहे. गोवा कस्टम विभागाचे साहाय्यक आयुक्त डॉ. पी. राघवेंद्र आणि एन. जी. पटेल यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कस्टम कायद्यानुसार गोवा कस्टम विभाग अतिरिक्त कस्टम आयुक्त टी. आर. गजलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
सहा महिन्यात 1 कोटी 30 लाखांचे सोने जप्त
गोवा कस्टम विभागाने एप्रिल महिन्यापासून आतापर्यंत दाबोळी विमानतळावर केलेल्या कारवाईत प्रवाशांनी अवैधमार्गाने भारतात आणलेलं 1 कोटी 30 लाखांचं सोनं, चौदा लाखांचं विदेशी चलन तसंच जवळपास 25 लाखांचं अन्य व्यापारी साहित्य जप्त केलं आहे.