मुंबई : देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली. यामध्ये सर्वाचं लक्ष लागलं आहे ते उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे. एबीपी न्यूजने केलेल्या सी व्होटर सर्व्हेमध्ये भाजप या राज्यात आपली सत्ता कायम ठेवणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. पण गेल्या वेळच्या तुलनेत भाजपला 100 जागांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर सपला 100 जागांचा फायदा होणार असून काँग्रेसला उत्तर प्रदेशमध्ये केवळ 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे.  


उत्तर प्रदेशमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली होती. या ओपिनियन पोलमध्ये भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याची शक्यता असून सपाला 145 ते 157 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला केवळ 3 ते 7 जागांवर समाधान मानावं लागेल. सध्यातरी उत्तर प्रदेशची निवडणूक ही भाजप विरुद्ध समाजवादी पक्ष अशीच दिसत आहे.


गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भाजपला 100 जागांचा तोटा होण्याची शक्यता
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या निवडणुकीत भाजपला जवळपास 100 जागांचा तोटा होण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी भाजपने नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली होती. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कामाचे परीक्षणही केलं जाईल. 


काँग्रेसची परीक्षा
यूपीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून ठाण मांडून असलेल्या काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची ही परीक्षा आहे. या ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला केवळ 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. प्रियांका गांधींनी हातरस असो वा लखीमपूर घटना असो, प्रत्येकवेळी सर्वसामान्यांची बाजू मांडण्यात अग्रेसर राहिल्या आहेत. पण तरीही ओपिनियन पोलच्या कलानुसार नागरिकांनी काँग्रेसला स्पष्टपणे नाकारल्याचं दिसून येतंय. 


मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांना लोकांची पसंती, दुसऱ्या क्रमांकावर अखिलेश यादव 
उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ यांना 43 टक्के लोकांनी पसंती दिली आहे तर अखिलेश सिंह यांना 34 टक्के पसंती दिली आहे. त्यानंतर 14 लोकांनी मायावती तर 4 टक्के लोकांनी प्रियंका गांधींना पसंती दिली आहे. 


जाणून घ्या काय सांगतोय ओपिनियन पोल...


उत्तर प्रदेश - एकूण - 403


कुणाला किती जागा?


भाजप  223-235
सपा 145-157
बसपा 8-16
काँग्रेस 3-7
इतर 4-8


-------------------------------


उत्तर प्रदेश 


कुणाला किती टक्के मते?


भाजप  41.5
सपा 33.3
बसपा 12.9
काँग्रेस 7.1
इतर 5.3


-------------------------------


उत्तरप्रदेश


कौल कसा बदलला?


भाजप 


सप्टेंबर 2021   259-267
ऑक्टोबर 2021   241-249
नोव्हेंबर 2021   213-221
डिसेंबर 2021   212-224
जानेवारी 2021   223-235


--------------------------------


उत्तरप्रदेश


कौल कसा बदलला?


सपा


सप्टेंबर 2021 109-117
ऑक्टोबर 2021                  130-138
नोव्हेंबर 2021 152-160
डिसेंबर 2021 151-167
जानेवारी 2021                  145-157


---------------------------------


उत्तर प्रदेश 


फायदा/तोटा


भाजप


217  325


2022  229 (223-225)


तोटा  96


----------------------------------


उत्तर प्रदेश


फायदा/तोटा


सपा 


2017  48


2022  151 (145-157)


फायदा  103


----------------------------------


उत्तर प्रदेश 


फेव्हरेट मुख्यमंत्री कोण?


योगी आदित्यनाथ 43 टक्के 
अखिलेश यादव 34 टक्के 
मायावती  14 टक्के
प्रियंका गांधी  4 टक्के
जयंत चौधरी   2 टक्के
इतर   3 टक्के 



सूचना : आजचा ओपिनियन पोल सी-व्होटर या संस्थेनं केलेला आहे. यासाठी RDD पद्धतीनुसार 18 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्यांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या पाचही राज्यातून वेगवेगळ्या वयोगटातील 89 हजार 536 जणांची मतं जाणून घेतली आहेत. हा ओपिनियन पोल 12 डिसेंबर 2021 ते जानेवारी 2022 दरम्यान करण्यात आला आहे. बदलत्या स्थितीनुसार या पोलमध्ये 3 ते 5 टक्क्यांची त्रुटी जाणवण्याची शक्यता आहे. मात्र हा निकश सगळ्या वर्गीकरणासाठी लागू होईल असं नाही.