पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपण सुखरुप असून आपल्यावरील उपचार यशस्वी होत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या मनोहर पर्रिकर यांच्यावर सध्या अमेरिकेत उपचार सुरु आहेत.
“माझ्यावर सुरु असलेले उपचार यशस्वी होत असून, मी काही आठवड्यात तुमच्यासोबत असेन”, असं गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे. आज गोव्यात भाजपचं कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात मनोहर पर्रिकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं.
https://twitter.com/manoharparrikar/status/995649396367736833
दरम्यान, या संमेलनात भाजपाध्यक्ष अमित शाह यांनीही भाजप कार्यंकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मनोहर पर्रिकर यांनी सर्जिकल स्ट्राईक करुन देशाची जगात वेगळी ओळख निर्माण करुन दिल्याचंही शाह म्हणाले.
माझ्यावरील उपचार यशस्वी, लवकरच तुमच्यासोबत असेन : मनोहर पर्रिकर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 May 2018 09:26 PM (IST)
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपण सुखरुप असून आपल्यावरील उपचार यशस्वी होत असल्याचा व्हिडीओ ट्विट केला आहे. स्वादुपिंडाच्या आजाराने त्रस्त असलेल्या मनोहर पर्रिकर यांच्यावर सध्या अमेरिकेत उपचार सुरु आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -