पणजी : गोव्यातील समुद्र किनारे म्हणजे पर्यटकांसाठी पर्वणी. गोव्याचे फेसाळलेले समुद्र किनारे पर्यटकांनी नेहमीच फुललेले असतात. मात्र गोव्यातील हेच समुद्र किनारे दिवसेंदिवस खालावत आहेत.
गोव्याच्या जवळपास 105 किलोमीटर समुद्र किनाऱ्यापैकी 25 किमी किनाऱ्यांची झीज झाली आहे. मानवी आणि नैसर्गिक प्रभावामुळे ही झीज होत असल्याचं, गोव्याच्या जलसंपदा मंत्रालयाने म्हटलं आहे.
जवळपास 24 टक्के समुद्रकिनाऱ्याची झीज झाली आहे, तर 30 टक्के किनाऱ्याचा वेगाने ऱ्हास होत आहे.
बार्देझ तालुक्यातील किनारी प्रदेशातील सर्वाधिक हानी झाली आहे. इथला जवळपास 7 किमीचा किनारा झिजला आहे. याशिवाय पेडणे, काणकोण, सालसेत या समुद्रकिनारीही मोठी झीज झाली आहे.