पणजी: तरुणाईनं मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी गोव्यामध्ये निवडणूक आयोगानं एक अनोखा उपक्रम राबवला आहे. 40 मतदार संघांमध्ये प्रत्येकी एका मतदान केंद्रावर गुलाबी रंगाचं मतदान केंद्र उभारण्यात आलंय. हे मतदान केंद्र आतून बाहेरून गुलाबी रंगाचं आहे.


विशेष म्हणजे, मतदान केंद्रातल्या कर्मचाऱ्यांनीही गुलाबी रंगाचे कपडे परिधान केले आहेत. 18 ते 20 वयोगटातल्या तरुण मतदारांनी मतदान केल्यानंतर एक टेडिबेअरही भेट म्हणून दिला जात. तरुण मतदारांना अकर्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने राबवलेल्या उपक्रमाचे तरुणाईतून कौतूक होत आहे.

दरम्यान,  गोव्यासह पंजाबमध्ये आज विधानसभेसाठी मतदान सुरु झालंय. गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली. 40 जागांसाठी तब्बल 251 उमेदवार रिंगणात आहेत. भाजपसाठी अस्तित्वाची लढाई आहे. सकाळी केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आपला मतदानाचा बजावला.

संबंधित बातम्या

गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी आज मतदान