Goa Assembly Election 2022 : पाच राज्यातील निवडणुकींचा ऐन रंगात आलाय. गोव्यात सत्ताधारी भाजपसह काँग्रेस, आप, तृणमुल काँग्रेस आणि इतर पक्षांनी वेगाने प्रचार सुरु केला आहे. गोवा विधानसभेच्या 40 जागांसाठी 14 फेब्रुवारी 2022 रोजी मतदान होईल तर 10 मार्च रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहे. यावेळी गोव्यात नशीब अजमावणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या पक्षावर काँग्रेसने टीकास्त्र सोडलं आहे. काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केजरीवाल म्हणजे भाजपची बी टीम असल्याचे म्हटले आहे. 


अरविंद केजरीवाल हा एक (imposter) बहरुपीया आहे. अरविंद केजरीवाल ही भाजपची B टीम आहे. जिथे जिथे भाजप निवडणूक हरणार असते तिथे भाजप अरविंद केजरीवालला उभे करते. गोवाची जनता अरविंद केजरीवालला ओळखून आहे, असा टोला सुरजेवाला यांनी लगावला आहे. टीएमसीमुळे भाजपला मदत होत आहे. ममता दीदीं आता ठरवावं की त्यांना भाजपची मदत करायची आहे का?यावेळेला निकाला नंतर आमच्या उमेदवारांचा घोडेबाजार होणार नाही याची पूर्ण खबरदारी आम्ही घेतली आहे, असेही सुरजेवाला म्हणाले. 





गोवा भाजप सरकार हे भ्रष्ट सरकार आहे. स्वःता मुख्यमंत्री प्रमोद सावंत वर भ्रष्टाचाराचे आरोप तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केली तर मलिक यांना हलवले गेलं पण प्रोमद सावंत मुख्यमंत्री पदावरच राहिले. हा आहे खरा भाजपचा चेहरा, असा टोला सत्ताधारी भाजपला सुरजेवाला यांनी लगावला.  आमचं सरकार येत आहे हे निश्चित आम्ही आमच्या उमेदवारांना शपथ भाजपच्या पैश्याच्या जोरावर चालणाऱ्या राजकरणामुळे दिली. भाजप म्हणत आहे की आम्ही १० जागा ही जिंकलो तरी सरकार बनवू यासाठी आम्हाला आमच्या उमेदवारांना जनते समोर शपथ द्यावी लागली, असेही ते म्हणाले.