LIC Brand News : लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि.(LIC) निर्गुंतवणुकीसाठी तयार असलेली देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. LIC हा $ 8.656 अब्ज (सुमारे 64,772 कोटी) मूल्यांकनासह देशातील सर्वात मजबूत आणि सर्वात मोठा ब्रँड आहे. या रेटिंगमुळे LIC जगातील सर्वात 'मजबूत' विमा ब्रँड बनला आहे. लंडनस्थित ब्रँड फायनान्स या ब्रँड सल्लागार कंपनीच्या मते, LIC चे बाजार मूल्य 2022 पर्यंत 43.40 लाख कोटी रुपये म्हणजेच, $59.21 अब्ज आणि 2027 पर्यंत रुपये 59.9 लाख कोटी ($78.63 अब्ज) असण्याचा अंदाज आहे.
रिपोर्ट्सनुसार, जगातील 10 सर्वात मौल्यवान विमा ब्रँडपैकी एक LIC आहे. याचाच अर्थ, LICच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा LIC प्रथम क्रमांकावर आहे. तर इटली पोस्ट इटालियन आणि स्पेनच्या मॅपफ्रे नंतर जागतिक स्तरावर ब्रँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. हे जगातील 10 सर्वात मौल्यवान विमा ब्रँडपैकी एक आहे. हा अहवाल नोव्हेंबर 2021 मध्ये तयार करण्यात आला होता. पण तो आता सार्वजनिक करण्यात आला आहे.
LIC ची 32 स्थानांची झेप
2021 मध्ये जागतिक ब्रँड क्रमवारीत 32 स्थानांनी झेप घेऊन LIC 206 व्या क्रमाकांवर पोहोचली आहे. ब्रँड फायनान्सच्या मते, 2021 मध्ये $8.655 अब्ज मूल्यांकनासह LIC हा देशातील सर्वात मोठा आणि मजबूत ब्रँड आहे. 2020 मध्ये त्याचे मूल्य $8.11 अब्ज होते. म्हणजेच, 6.8 टक्क्यांची वाढ झाली आहे.
LIC ची ब्रँड व्हॅल्यू 6.8 टक्क्यांनी वाढली
2021 मध्ये जगातील 100 प्रमुख विमा कंपन्यांची ब्रँड व्हॅल्यू सहा टक्क्यांनी घसरून $433 अब्ज झाली आहे. LIC च्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये 6.8 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
टॉप 10 कंपन्यांमध्ये पाच चीनी कंपन्यांचाही समावेश
टॉप 10 मध्ये समावेश अहवालानुसार टॉप 10 मध्ये 5 चीनी विमा कंपन्या आहेत. पिंग एन इन्शुरन्स ब्रँड मूल्यात 26 टक्क्यांनी घट नोंदवूनही जगातील सर्वात मौल्यवान विमा ब्रँड बनला आहे. पहिल्या 10 मध्ये दोन अमेरिकन कंपन्या आहेत. तर, फ्रान्स, जर्मनी आणि भारताची प्रत्येकी एक कंपनी आहे. LIC ही एकमेव देशांतर्गत विमा कंपनी आहे जी अव्वल 10 सर्वात मजबूत ब्रँड आणि टॉप 10 मध्ये याचा समावेश झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Petrol-Diesel Price : राज्यात पेट्रोल शंभरीपार; मुंबई, पुणे, नागपूरसह मोठ्या शहरांतील आजचे दर काय
- PhonePe कंपनीचा म्युच्युअल फंड लवकरच; सेबीकडे अर्ज दाखल
- Adani Wilmar IPO: अदानी समूहात गुंतवणूक करण्याची संधी, आजपासून Wilmar आयपीओ खुला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha