पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या शवागरातून एका युवकाचा मृतदेह गायब होण्याची घटना समोर आली आहे. संबंधिताच्या कुटुंबाने चौकशी केल्यानंतर काल सायंकाळी अज्ञात मृतदेहांची विल्हेवाट लावताना या युवकाच्या शवाचीही विल्हेवाट लावण्यात आली अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित युवकाच्या कुटुंबाने आगशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे.
जानुझच्या कुटुंबियांची आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माफी मागीतली असून या घटनेस जबाबदार धरून डॉ. एडमंड, डॉ. मच्छिंद्र जल्मी व प्रकाश नार्वेकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तिघांविरुद्ध पोलिस तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.
हळदोणा येथील जानुझ गोन्साल्वीस या 24 वर्षीय तरुणाच्या मृतदेहाची शवचिकित्सा 24 सप्टेंबर रोजी झाली होती. त्यानंतर शवागरात त्याचा मृतदेह ठेवण्यात आला. आज त्याच्या कुटंबाने मृतदेह ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली तेव्हा शवागरात मृतदेहच नसल्याचे आढळून आले. काल संध्याकाळी शवागरातील सुमारे दहा अज्ञात मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात आली त्यात जानुझच्या मतृदेहाचाही समावेश करण्यात आला अशी माहिती शवागराच्या कर्मचाऱ्यांनी दिली.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ.प्रदीप नाईक यांच्या मार्फत चौकशी सुरू झाली आहे. योग्य ती कारवाई होईल असे महाविद्यालयाचे अधिक्षत डॉ.शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. विभागाचे प्रमुख डॉ.एडमंड रॉड्रीगीश यांना हल्लीच सरकारने निवृत्तीनंतर सेवावाढ दिली होती. सेवावाढीच्या काळात त्यांच्यावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
दुपारपर्यंत युनूसच्या कुटुंबाने तक्रार नोंदवली नव्हती. आगशी पोलीस स्थानकाचे निरीक्षक उदय गावडे यांना विचारले असता कुटुंबाने आपण तक्रार करण्यासाठी येत असल्याचे कळवले आहे पण अजून तक्रार आलेली नाही. तक्रार आल्यानंतरच पुढील तपास होईल असे स्पष्ट केले.
गोमेकॉ शवागृह मृतदेह गायब प्रकरणास आरोग्यमंत्री विश्वजीत राणे जबाबदार असून त्यांच्या विरोधात काँग्रेस एफआयआर दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेस प्रवक्ते उरफान मुल्ला यांनी दिली आहे. राणे यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्री पर्रिकर यांनी त्यांना हटवावे,अशी मागणी मुल्ला यांनी केली आहे.गोमेकॉच्या शवागरा मधील मृतदेह गायब होण्यामागे अवयव काढून विकणारे रॅकेट तर कार्यरत नाही ना, असा संशय देखील मुल्ला यांनी व्यक्त केला. हा प्रकार गंभीर असून त्याला आरोग्यमंत्री जबाबदार असल्याने कर्मचाऱ्यां पेक्षा त्यांच्यावरच एफआयआर दाखल करण्याची गरज असल्याचे मत मुल्ला यांनी व्यक्त केले.
गोमॅकोच्या शवागरातून मृतदेह गायब
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2018 10:41 PM (IST)
जानुझच्या कुटुंबियांची आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माफी मागीतली असून या घटनेस जबाबदार धरून डॉ. एडमंड, डॉ. मच्छिंद्र जल्मी व प्रकाश नार्वेकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -