इंदूर : मध्य प्रदेशमधील सर्वात मोठ्या सरकारी रुग्णालयात सलग दोन दिवस दोन बालकांच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. इंदूरच्या रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे 18 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे.


 
शस्त्रक्रियेदरम्यान ऑक्सिजनऐवजी रुग्ण बालकाला नाईट्रेड वायू दिल्याने मृत्यू झाल्याचा दावा पालकांनी केला आहे. आपली चूक लपवण्यासाठी बालकाला डॉक्टरांनी व्हेंटिलेटरवर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी मुलाचा मृत्यू झाल्याचं सांगितलं, असा आरोपही पालकांनी केला आहे.

 
आदल्या दिवशीही अशाच प्रकारची घटना घडल्यानं पालकांनी रुग्णालयाच्या कारभाराविरोधात मोठा संताप व्यक्त केला आहे. रुग्णालय आणि डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईची मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे. पोस्टमार्टमनंतर बालकाचं पार्थिव कुटुंबीयांना सोपवण्यात येणार आहे, मात्र पालकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे.