मुंबई: आपल्या ‘पीएफ’मध्ये नेमकी किती रक्कम जमा आहे, नियमित जमा होत आहे की नाही याची माहिती मिळवणं आता सहज शक्य होणार आहे.

कारण आता फक्त मिस्ड कॉल किंवा एसएमएस करून तुम्ही प्रॉव्हिडंट फंडातील शिल्लक जाणून घेऊ शकणार आहात.

त्यासाठी 011-2290 1406 या क्रमांकावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल द्यावा लागेल.

मिस्ड कॉल देण्यासाठी ‘ईपीएफओ’च्या कागदपत्रांमध्ये नोंदवलेलाच मोबाईल क्रमांक वापरण्याची आवश्यकता आहे. एकदा मिस्ड कॉल दिल्यानंतर काही वेळातच एसएमएस येईल, ज्यामध्ये शिल्लक रकमेची माहिती असेल.

तुमचा मोबाईल नंबर पीएफ अकाऊंटला कसा लिंक करायचा?

  • https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/ या वेबसाईटवर जा

  • उजव्या बाजूला खालील बाजूस Activate UAN वर क्लिक

  • तिथे UAN नंबर टाका. हा नंबर तुमच्या पे स्लिपवर असेल.

  • यानंतर आधार, पॅन, नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, ईमेल आयडी वगैरे सर्व माहिती भरा

  • त्यानंतर Get Authorization Pin वर क्लिक करा. तुम्हाला मोबाईलवर OTP येईल. तो भरा, त्यानंतर तुम्हाला पासवर्डचा एसएमएस येईल.

  • मग तुम्ही साईन इन करुन तुमचा पीएफ, ई पासबूक बघू शकता.

  • तसंच 011- 2290 1406 या नंबरवर मिस्ड कॉल देऊन तुमच्या पीएफ खात्यातील रक्कम पाहू शकता.




UAN नंबर महत्त्वाचा

प्रत्येक कंपनी आपल्या कर्मचाऱ्याला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर अर्थात UAN पुरवते. तो नंबर अॅक्टिव- कार्यरत करणं आवश्यक आहे. एकदा का तुम्ही UAN अपडेट आणि तुमच्या पीएफ अकाऊंटला लिंक केलात तर तुमचा पीएफ पाहाणं, ई पासबूक हे सर्व सोपं होतं.

तुमचा UAN पीएफसोबत आधार कार्डलाही लिंक करणं आवश्यक आहे.

ई पासबुक

तुम्हाला तुमच्या पीएफ अकाऊंटवर कोणत्या महिन्यात किती रक्कम जमा झाली याबाबतची माहिती ई पासबुकवर पाहायला मिळू शकते. त्यासाठी EPFO च्या वेबसाईटवर जाऊन ई पासबुक कार्यरत करावं लागले.

वेबसाईटवर गेल्यानंतर उजव्या बाजूला ई पासबुकचा पर्याय दिसेल. तिथे UAN नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर ई पासबुक दिसेल.