News Anchor Gitanjali Aiyar Death: दूरदर्शनच्या पहिल्या इंग्रजी वृत्तनिवेदिका (News Anchor) गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन (7 जून)  झाले. गीतांजली अय्यर (Gitanjali Aiyar) यांनी 30 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर वृत्तनिवेदन केले. त्या 76 वर्षाच्या होत्या. 1971 साली त्या दूरदर्शनशी जोडल्या गेल्या. त्यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला. 


गीतांजली अय्यर यांच्या निधनाची बातमी कळताच केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur)  यांनी ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अनुराग ठाकूर म्हणाले, दूरदर्शन आणि इंडिया रेडियोच्य पहिल्या लोकप्रिय इंग्रजी वृत्तनिवेदिका गीतांजली अय्यर यांच्या निधनाची कळताच धक्काच बसला. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि कुटुंबियाला हे अपरिमित दुःख सहन करण्याचे सामर्थ्य मिळो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.






गीतांजली अय्यर यांची कारकीर्द 


गीतांजली अय्यर यांनी दूरदर्शनमध्ये 1971 साली वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आजवरच्या नामवंत वृत्तनिवेदकांमध्ये त्यांच्या नावाचा समावेश आवर्जून केला जातो. 1989 साली त्यांना इंदिरा गाधी प्रियदर्शनी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गीतांजली अय्यर यांनी कोलकाताच्या लोरेटो महविदयालयात पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये डिप्लोमा केला. 


अनोख्या हेअरस्टाईलसाठी होत्या प्रसिद्ध


गीतांजली अय्यर या वृत्तनिवेदनासह आपल्या हेअरस्टाईलसाठी प्रसिद्ध होत्या. तसेच मॉर्डन लुक आणि साडी या वेगळ्या हटक्या कॉम्बिनेशनमुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. 


मालिकेमध्ये केले होते काम


दूरदर्शनमध्ये न्यूज अँकर म्हणून यशस्वी कारकीर्द केल्यानंतर गीतांजली यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंगच्या जगातात प्रवेश केला. त्या वर्ल्ड वाईड फंड,  CII या उद्योग संघटनेच्या सल्लागारही होत्या. त्या पत्रकारिता जगतातल्या स्टार अँकर होत्या. अय्यर यांनी  श्रीधर क्षीरसागर यांच्या 'खानदान' या मालिकेत काम केले होते.


हे ही वाचा :