बर्थडे पार्टीत 17 वर्षीय विद्यार्थिनीवर चार मित्रांचा गँगरेप
एबीपी माझा वेब टीम | 04 Jul 2017 11:41 AM (IST)
हैदराबाद : मित्राच्या बर्थडे पार्टीनंतर 17 वर्षीय विद्यार्थिनीवर चौघा मित्रांनी गँगरेप केल्याचा आरोप आहे. तेलंगणातील खम्माम शहरामध्ये रविवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित तरुणी मित्राच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी त्याच्या घरी गेली होती. पार्टीनंतर चौघांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. आरोपींनी या घटनेचं चित्रीकरण केल्याचंही पीडितेने सांगितलं आहे. सोमवारी पीडितेने खम्माम 3 टाऊन पोलिस स्थानकात चौघांविरोधात तक्रार दाखल केली. पीडिता अल्पवयीन असून चारही आरोपी 18 वर्षांवरील आहेत. चौघांवर 'पोस्को' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी आपल्यावर गँगरेप केला असून घटनेचं चित्रीकरणही केलं. ते जाहीर करण्याची धमकी देऊन आपल्याला गप्प बसण्यास सांगितल्याचंही तिने तक्रारीत म्हटलं आहे.