नवी दिल्ली : नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन अण्णांच्या भेटीसाठी पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहेत.
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे सध्या महाराष्ट्र सदनात असून, ते संध्याकाळी रामलीलावर जाऊन अण्णांशी चर्चा करण्याची शक्यता आहे. मात्र ते नेमके अण्णांच्या भेटीला कधी पोहोचतील, याबाबत कोणतीही ठोस माहिती अद्याप मिळाली नाही.
गिरीश महाजन याआधीही अण्णांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले होते. अण्णा उपोषणाला बसण्याच्या आदल्या दिवशी महाजनांनी दिल्लीत जाऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. मात्र तेव्हाही अण्णा उपोषणावर ठाम होते आणि त्यांनी त्याप्रमाणे उपोषण सुरुही केले. अगदी त्याहीआधी राळेगणमध्येही गिरीश महाजन यांनी जाऊन अण्णांशी याबाबत चर्चा केली होती.
जनलोकपालसह इतर मागण्यांसाठी रामलीलावर उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंचं वजन 3 किलोनं घटलं आहे. तर एका आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे. मात्र अद्यापही सरकारकडून तोडगा काढण्याचे कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. मात्र पहिले दोन दिवस अण्णांच्या आंदोलनाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.
उपोषणाचा तिसरा दिवस, अण्णांचं वजन दोन किलोने घटलं
जनलोकपालसह इतर मागण्यांसाठी रामलीलावर आंदोलनाला बसलेल्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं वजन 2 किलोने घटलं आहे. तर एका आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे. या आंदोलनाचा आज (रविवार) तिसरा दिवस आहे.
संबंधित बातम्या :
उपोषणाचा तिसरा दिवस, अण्णांचं वजन दोन किलोने घटलं
अण्णांच्या उपोषणाचा दुसरा दिवस, एकाची प्रकृती बिघडली
रामलीला मैदानावर पुन्हा अण्णा हजारे!
अण्णांसोबत चर्चेसाठी गिरीश महाजन पुन्हा दिल्लीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Mar 2018 04:19 PM (IST)
जनलोकपालसह इतर मागण्यांसाठी रामलीलावर उपोषणाला बसलेल्या अण्णा हजारेंचं वजन 3 किलोनं घटलं आहे. तर एका आंदोलकांची प्रकृती बिघडली आहे.
फाईल फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -