नवी दिल्ली : गुजरात निवडणुकांच्या तोंडावर मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. भारताच्या जीडीपीची घसरण थांबून जीडीपी 5.7 टक्क्यांवरुन 6.3 टक्क्यांवर पोहोचला आहे. नोटबंदीनंतर सातत्यानं पाचही टप्प्यांमध्ये जीडीपीच्या दरात घसरण झाली होती.

नोटाबंदी आणि जीएसटीमुळे जुलै ते सप्टेंबर या त्रैमासिकात जीडीपी नीचांकी म्हणजेच ५.७ टक्क्यांवर घसरला होता.

गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर तुफान टीका केली होती. त्यामुळे आता समोर आलेल्या या आकड्यांनी केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदबरम यांनी जीडीपी वाढीचं झाल्याचं कौतुक केलं आहे. पण तात्काळ कोणत्याही निष्कर्षावर पोहचणं उतावीळपणांच होईलं असंही ते यावेळी म्हणाले. पुढीत तीन ते चार त्रैमासिकात जीडीपीचा दर कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं आहे. असंही ते यावेळी म्हणाले.