GATE Admit Card : अनेक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी संस्थेने (IIT) खडगपूरच्या वतीने पदवी अॅप्टीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग (GATE) 2022चे प्रवेश पत्र जाहीर केले आहे. यापूर्वी गेट परीक्षा 2022 चे प्रवेश पत्र 7 जानेवारी 2022 रोजी जाहीर करणार असं सांगितलं होतं. मात्र, काही कारणास्तव प्रवेश पत्र (Admit Card)जाहीर करण्यास विलंब झाला. परंतु, आता हे प्रवेश पत्र संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (Official Website)उपलब्ध आहे. परीक्षार्थींसाठी हे प्रवेश पत्र संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitkgp.ac.in उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. GATE परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी परीक्षार्थींना त्यांचे GATE 2022 लॉगिन क्रेडेंशियल (Login Credentials)डिटेल्स भरावे लागतील. यामध्ये परिक्षेची तारीख, वेळ आणि केंद्राचे नाव यांचं वर्णन आहे.
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी खडगपूर संस्थेने (Indian Institute of Technology Kharagpur) गेट परीक्षा 5, 6, 12 आणि 13 फेब्रूवारी 2022 रोजी ऑनलाईन पद्धतीने (Online Mode)घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेचे पहिले सत्र सकाळी 09:00 ते दुपारी 12:00 पर्यंत आहे. तर दुसरे सत्र दुपारी 02:30 ते सायंकाळी 05:30 वाजेपर्यंत आहे. गेट परीक्षेचा निकाल 17 मार्च, 2022 रोजी जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अशा प्रकारे करा प्रवेश पत्र 2022 डाऊनलोड :
- गेटच्या अधिकृत संकेतस्थळावर gate.iitkgp.ac.in 2022 जा.
- “IITKGP GATE 2022 प्रवेश पत्र" या लिंकवर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रिनवर लॉग इन करा.
- नमूद केलेल्या रकान्यात तुमचा अचूक आयडी आणि पासवर्ड टाकून "सबमिट" बटणावर क्लिक करा.
- संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर गेट परिक्षेचे प्रवेश पत्र 2022 तुम्हाला स्क्रिनवर दिसेल.
हे ही वाचा :
- EV Charging Stations : आता घरी किंवा ऑफीसमध्ये चार्जिंग करा इलेक्ट्रिक कार, चार्जिंग स्टेशनसाठीच्या नियमांमध्ये मोठा बदल
- Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; 'या' राज्यात 26 जानेवारीपासून पेट्रोलवर सबसिडी
- Corona Vaccination in India : देशात लसीकरणाची वर्षपूर्ती! वर्षभरात 157 कोटी डोस, आता बुस्टर डोसचं आव्हान
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha