नवी दिल्ली : भारतात 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 परिषद (G20 Summit 2023) पार पडणार आहे. नवी दिल्ली येथील भारत मंडपम (Bharat Mandapam) येथे ही परिषद पार पडणार आहे. परदेशी पाहुण्याच्या स्वागतासाठी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. नवी दिल्लीमध्ये सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परदेशी पाहुण्याच्या राहण्या आणि खाण्यासाठी खास तयारी करण्यात आली आहे. जी-20 परिषदेसाठी भारतात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण दिलं जाणार आहे. तसेच त्यांच्या जेवणासाठी खास मेन्यूही तयार करण्यात आला आहे. 


जी-20 परिषदेसाठी भारतात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांची खास सोय


जी-20 परिषदेसाठी भारताची राजधानी नवी दिल्ली एखाद्या नववधूप्रमाणे सजली आहे. ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. भारतीय कला आणि संस्कृती दाखवणारे देखावे दिल्लीत जागोजागी पाहायला मिळत आहेत. जी-20 साठी येणाऱ्या पाहुण्यासाठी खास भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थांचा बेतही करण्यात आला आहे. परदेशी पाहुण्यांना अगदी राजेशाही थाटात सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण वाढलं जाईल.


सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण


जी-20 परिषदेत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी खास तयारी करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीची झलक दाखवण्यासाठी पाहुण्यांना सोने आणि चांदी कोटेड भांड्यामध्ये जेवण वाढलं जाईल. या सर्व भांड्यांना सोने आणि चांदीचा मुलामा देण्यात आला आहे. जानेवारी 2023 पासूनच जी-20 परिषदेसाठी तयारी सुरु करण्यात आली. राजे-महाराजे ज्या प्रकारच्या ताटात जेवायचे त्या थीमच्या आधारे ही ताटं आणि इतर भांडी डिझाइन करण्यात आली आहेत.






परदेशी पाहुण्यांसाठी खास पारंपारिक बेत


परदेशी पाहुण्यांसाठी दिल्लीतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीतील द क्लेरिजेस होटलमधील पाहुण्यांसाठी  भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थांचा बेत आहे. यामध्ये गुजराती आणि राजस्थानी पदार्थांचा समावेश आहे. ताज हॉटेलमधील परदेशी पाहुण्यांसाठी नान खटाई आणि गुलकंद लाडूसोबत अवधी चिकन कोरमा आणि प्रसिद्ध मासांहारी खाद्यपदार्थ असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


G20 Summit India : चांद्रयान-3, नटराज, तिरंगी रंगांची रोषणाई... G-20 परिषदेसाठी दिल्ली सजली