नवी दिल्ली: दुबईत पर्यटनासाठी जाणाऱ्यांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. हीच बाब लक्षात घेत संयुक्त अरब अमिरातच्या सरकारने (यूएई) मोठा निर्णय घेतला आहे. युएई सरकारच्या नव्या निर्णयानुसार भारतीय पर्यटकांना दोन दिवसांचा मोफत ट्रान्झिट व्हिसा मिळणार आहे.
यूएई सरकारच्या नव्या निर्णयामुळे दुबई किंवा अबुधाबीवरून प्रवाशांना जगभरात कोठेही जायचे असल्यास त्यांना 48 तास दुबईमध्ये राहण्यासाठी काहीही खर्च येणार नाही. याशिवाय पर्यटकांना जर दोन दिवसांहून अधिक काळ येथे राहायचे असल्यास 50 दिरहॅम अर्थात 1000 रुपयांचे शुल्क देऊन 96 तास म्हणजेच चार दिवस राहता येणार आहे.
भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी यूएई सरकारने हा निर्णय घेतला आहे. मात्र ही सुविधा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही सूचना अद्याप यूएई सरकारकडून जारी करण्यात आलेली नाही. दुबईतील विमानतळांवर उभारलेल्या 'पासपोर्ट कंट्रोल हॉल'मध्ये यूएईचा ट्रान्झिट व्हिसा मिळणार आहे.
दुबई आणि अबुधाबीमध्ये 2017 मध्ये जवळपास 3.70 लाख भारतीय पर्यटकांनी भेट दिली आणि आता ही संख्या वाढतच जात आहे. यूएईशिवाय इस्राइल, जपान, ओमान आदी देशांनी भारतीय पर्यटकांसाठी व्हिसाचे नियम शिथिल केले आहेत.
दुबईत व्हिसाविना दोन दिवस राहता येणार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Jun 2018 08:31 AM (IST)
दुबईत पर्यटनासाठी जाणाऱ्यांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या मोठी आहे. हीच बाब लक्षात घेत भारतीय पर्यटकांना लक्षात घेत संयुक्त अरब अमिरातच्या सरकारने (यूएई) मोठा निर्णय घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -