नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाच्या चार माजी न्यायमूर्तींनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना खुलं पत्र लिहिलं आहे. यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश पी. बी. सावंत, हायकोर्टाचे निवृत्त न्यायाधीश ए. पी. शाह, के. चंदू आणि एच सुरेश यांनी पत्र लिहून काही सल्ले दिले आहेत.


संवेदनशील आणि महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी न्यायाधीशांकडे वर्ग करण्यासाठी नियम बनवण्यात यावा, असं या निवृत्त न्यायमूर्तींनी म्हटलं आहे. आपल्या मर्जीने प्रकरणं वर्ग करणं चुकीचं असल्याचं या चार न्यायमूर्तींचं म्हणणं आहे.

असा नियम बनवला जात नाही, तोपर्यंत सर्व महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी 5 वरिष्ठ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने करावी, अशी मागणी या निवृत्त न्यायमूर्तींनी केली आहे.

विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या ज्या चार विद्यमान न्यायमूर्तींनी प्रश्न उपस्थित केले होते, ते योग्य असल्याचं सांगत सरन्यायाधीशांनी त्यांच्या कार्यशैलीत बदल करावा, असा सल्ला या निवृत्त न्यायमूर्तींनी दिला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेत आपलं मत जाहिरपणे माध्यमांसमोर मांडलं होतं. एका पत्राद्वारे विद्यमान न्यायमूर्तींनी दीपक मिश्रा यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती.

संबंधित बातम्या :

सुप्रीम कोर्ट नीट काम करत नाही, खुद्द न्यायमूर्तींची हतबलता

सरन्यायाधीशांवर प्रश्न उपस्थित करणारे चार न्यायमूर्ती कोण आहेत?

सरकारसमोर झुकू नका, सरकारला झुकवा : कोळसे-पाटील

न्यायमूर्तींच्या नाराजीचं कारण असलेलं जज लोया मृत्यू प्रकरण काय आहे?