मुंबई : रिझर्व्ह बँकेच माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उर्जित पटेल यांनी राजीनामा देणं ही चिंतेची बाब आहे. रिझर्व्ह बँक आणि सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाची स्थिती निर्माण झाली होती. अशात उर्जित पटेल यांनी राजीनामा का दिला याचं कारण समोर येणं गरजेचं आहे, असं रघुराम राजन म्हणाले.
उर्जित पटेल यांच्या राजीनाम्याचं स्वागत केलं पाहिजे. मात्र उर्जित पटेल यांनी ज्या परिस्थितीत राजीनामा दिला, त्याबाबच चर्चा होणं गरजेचं आहे. उर्जित पटेलांच्या राजीनाम्याने प्रत्येक भारतीयाला चिंतीत होणे गरजेचे आहे. कारण देशाची प्रगती आणि अर्थव्यवस्थेसाठी रिझर्व्ह बँक मजबूत राहणे गरजेचे आहे, असं रघुराम राजन म्हणाले.
उर्जित पटेल यांना राजीनामा देताना यामध्ये वैयक्तिक कारण असल्याचं म्हटलं आहे. मात्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेतील वादाच्या पार्श्वभूमीवर उर्जित पटेलांच्या राजीनाम्याला विरोधाच्या दृष्टीकोनातून पाहणे गरजेचे आहे. उर्जित पटेल यांना पद का सोडलं याचं नेमकं कारण समोर आलं पाहिजे, असं रघुराम राजन म्हणाले.
रघुराम राजन यांच्यानंतर पटेल यांनी रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची धुरा सांभाळली होती. वैयक्तिक कारणांमुळे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावरुन तात्काळ पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक वर्ष रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासाठी विविध भूमिका बजावणं ही माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याची प्रतिक्रिया उर्जित पटेल यांनी दिली.