Dr Manmohan Singh Death : भारताचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन (Manmohan Singh Death) झाले आहे. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. दिल्लीतील एम्समध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. ते दोनदा भारताचे पंतप्रधान राहिले आहेत. याशिवाय देशाच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलांसाठीही त्यांची ओळख आहे. जाणून घेऊयात मादी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी त्यांचे शिक्षण कोठून केले याबाबतची माहिती. 


माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पश्चिम पंजाबमधील एका गावात झाला. डॉ. सिंग 2004 ते 2014 या काळात भारताचे पंतप्रधान होते. देशाच्या अर्थव्यवस्थेतील ऐतिहासिक बदलांसाठी ते कायम देशवासियांच्या स्मरणात आहेत. ते देशाचे पहिले शीख पंतप्रधान होते.  त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय अर्थव्यवस्थेत मोठे बदल झाले होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण पंजाब विद्यापीठातून घेतले. येथून त्यांनी 1952 मध्ये अर्थशास्त्रात पदवी घेतली होती. 1954 मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर ते केंब्रिज विद्यापीठात गेले,तिथे त्यांनी 1957 मध्ये अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफिल्ड कॉलेजमधून डॉ. फिलची पदवीही मिळवली.


महत्त्वाच्या पदांवर काम 


माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी पंजाब विद्यापीठातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. येथे त्यांनी व्याख्याता म्हणून काम केले. त्यानंतर ते दिल्ली विद्यापीठात आले. 1960 मध्ये त्यांनी भारतातील परकीय व्यापार मंत्रालयात सल्लागार म्हणून काम केले. 1970 ते 1980 पर्यंत डॉ. सिंह यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. यामध्ये मुख्य आर्थिक सल्लागार, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष अशा पदांचा समावेश आहे. 1991 मध्ये त्यांना भारताचे अर्थमंत्री बनवण्यात आले. 2004 मध्ये ते भारताचे पंतप्रधान झाले आणि त्यानंतर 2009 मध्ये त्यांची दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवड झाली. 2004 ते 2014 पर्यंत ते सलग 10 वर्ष देशाचे पंतप्रधान होते. 


प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. आता त्यांचं निधन झालं आहे. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली. 


महत्वाच्या बातम्या:


Manmohan Singh : अर्थव्यवस्थेचा 'सरदार' हरपला! माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचे निधन, 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास