नवी दिल्ली : माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत आहे, तसेच त्यांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. त्यामुळे उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


जेटली यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. एंडोक्रायनोलॉजिस्ट, हृदयरोग आणि मूत्रपिंड विसेषज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह जेटली यांना भेटण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून अरुण जेटलींची तब्येत खराब असल्याने, त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. जेटली यांनी ट्विटरद्वारे सांगितले होते की, गेल्या 18 महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रीपदासाठी विचार केला जाऊ नये.

व्हिडीओ पाहा