अजित जोगी यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले. अजित जोगी यांना लोकसेवा करण्याचा छंद होता. या प्रेमापायी त्यांनी नोकरशहा आणि राजकीय नेत्याच्या रुपात अपार मेहनत घेतली. विशेषकरुन आदीवासी समाजातील लोकांच्या आयुष्यात बदल व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी मेहनत घेतल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.
अजित जोगी यांचा थोडक्यात परिचय
- जन्म तिथी - 29 एप्रिल 1946
- जन्म स्थान - बिलासपूर छत्तीसगड
- इतिहास - सामान्य कुटुंबात जन्म. अजित जोगी लहानपणापासून प्रतिभावान होते. अभ्यासात नेहमीच अग्रेसर असायचे.
- 1968 मध्ये त्यांनी मौलाना आझाद कॉलेज ऑफ टेक्नोलॉजी, भोपाळकडून मेकॅनिकल इंजीनियरिंगमध्ये सुवर्ण पदक मिळवून अभ्यासक्रम पूर्ण केला. महाविद्यालयीन दिवसात जोगी यांची आपल्या विभागातील विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती.
- 1967 मध्ये प्रशासन अभियंता महाविद्यालय, रायपूर (छत्तीसगड) मध्ये प्राध्यापक (1967-68) कार्यरत होते.
- 1974 मध्ये अजित जोगी यांची भारतीय पोलीस सेवा आणि भारतीय प्रशासकीय सेवेसाठी निवड झाली.
- 1974 ते 1986 पर्यंत मध्य प्रदेशातील सिधी, शाहडोल, रायपुर आणि इंदौर जिल्ह्यांमध्ये 12 वर्षे सेवा करुन सर्वात जास्त काळ सेवा देणारे म्हणून कलेक्टर ऑफिसमध्ये रेकॉर्ड आहे.
राजकीय परिचय
राजकारणात येण्यापूर्वी अजित जोगी यांनी सिव्हिल परीक्षा उत्तीर्ण केली होती. तसंच ते तहसीलदार या पदावर कार्यरत होते. 1988 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती येण्यापूर्वी त्यांनी खासदार म्हणूनही काम केलं आहे. छत्तीसगढच्या निर्मितीनंतर त्यांनी 2000-2003 या कालावधीत मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतली होती. दरम्यान, 2016 मध्ये काँग्रेसच्या काही नेत्यांसोबत वाद झाल्यानंतर त्यांनी जनता काँग्रेस छत्तीसगढ असा आपला पक्ष स्थापन केला होता.
India Lockdown | लॉकडाऊनसंदर्भात पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह यांच्यात महत्वाची बैठक