गुवाहाटी : आसामचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तरुण गोगोई यांचं वयाच्या 84 व्या वर्षी निधन. गोगोई यांना 2 नोव्हेंबरला गुवाहाटी मेडिकल कॉलेजमध्ये (जीएमसीएच) दाखल करण्यात आले होते. शनिवारी प्रकृती खालावल्याने गोगोई याना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तरुण गोगोई यांना 2 ऑगस्टला कोरोना विषाणूची लागण झाली होती. दुसर्याच दिवशी त्यांना जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर, 25 ऑक्टोबरला त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. त्यांच्यावर पोस्ट कोविड उपचार सुरु होते. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना पुन्हा जीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालावली. आज सायंकाळी 5.34 मिनीटांनी गोगोई यांनी अखेरचा श्वास घेतला.
तरुण गोगोई लोकप्रिय नेते होते : पंतप्रधान मोदी
तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कुटुंबीय व समर्थकांबद्दल सांत्वन व्यक्त केले आहे. "श्री. तरुण गोगोई हे एक लोकप्रिय नेते आणि ज्येष्ठ प्रशासक होते, ज्यांचा आसाम आणि केंद्रात अनेक वर्षांचा राजकीय अनुभव होता. या दु:खाच्या घटनेत त्यांचे कुटुंब आणि समर्थकांबद्दल माझे सांत्वन आहे. ओम शांती." "
तरुण गोगोई खरे कांग्रेसी होते : राहुल गांधी
तरुण गोगोई यांच्या निधनाबद्दल राहुल गांधी यांनी ट्विट करुन म्हटले आहे, की "तरुण गोगोई खरे काँग्रेस नेते होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आसाममधील सर्व लोकांना आणि समुदायाला एकत्र आणण्यात घालवले. माझ्या दृष्टीने तो एक महान नेता आणि बुद्धिमान शिक्षक होते. मी त्यांच्यावर प्रेम करतो आणि त्यांचा आदर करतो. मला त्यांची आठवण येईल माझे प्रेम आणि सहानुभूती गौरव त्याच्या कुटुंबीयांबद्दल आहे.