नवी दिल्ली: आपचे माजी मंत्री संदीप कुमार यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आता अटकही करण्यात आली आहे. दोन दिवसापूर्वी एबीपी न्यूजनं संदीप कुमार आश्लील चाळे करतानाचं सेक्स स्कँडल उजेडात आणलं होतं. त्यानंतर आज याप्रकरणातील पीडित महिला समोर आली आहे.


 

पीडित महिलेनं संदीप कुमारांच्याविरोधात तक्रार दिली आहे. त्यानंतर दिल्लीच्या रोहिणी पोलिसांनी संदीप कुमारांविरोधात गुन्हा दाखल केल. याप्रकरणी संदीप कुमार यांना आता पोलिसांनी अटक केल्याची माहितीही मिळते आहे. उद्या संदीप कुमार यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

 

दोन दिवसांपूर्वी संदीप कुमार एका महिलेसोबत आश्लील लिला करतानाचा व्हिडीओ समोर आला. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. संदीप कुमार दिल्लीमध्ये महिला आणि बालविकास मंत्रायलयाची जबाबदारी सांभाळत होते. पण आपच्या माजी मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे आपवर चौफेर टीका होते आहे.

 

संबंधित बातम्या:

 

सेक्स स्कँडल: त्या सीडीत दिसणारा मी नाही : संदीप कुमार


 

सेक्स स्कँडल प्रकरणी दिल्लीचे मंत्री संदीप कुमार यांची हकालपट्टी