Hurun Global 500 : ह्युरन रिसर्च इन्स्टिट्यूटने Hurun Global 500 ही यादी जाहीर केली असून जगातल्या सर्वात श्रीमंत 500 कंपन्यांमध्ये आता 12 भारतीय कंपन्यांचा समावेश झाला आहे. या यादीमधील भारतीय कंपन्यांचा विचार करता रिलायन्स सर्वात वरच्या स्थानी असून त्यानंतर टीसीएस (टाटा कन्सल्टिंग सर्व्हिसेस) आणि एचडीएफसी बॅंकेचा समावेश आहे. 


अॅपलने या यादीत पहिला क्रमांक पटकावला असून त्या कंपनीची व्हॅल्यू ही 2.4 लाख कोटी डॉलर्स इतकी आहे तर मायक्रोसॉफ्टची 2.11 लाख कोटी डॉलर्स इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर अॅमेझॉन असून त्याची व्हॅल्यू ही 1.8 लाख कोटी डॉलर्स इतकी आहे तर चौथ्या क्रमांकावरील अल्फाबेटची व्हॅल्यू ही 1.7 लाख कोटी डॉलर्स इतकी आहे.


Hurun Global 500 या यादीनुसार, जगातील चार मोठ्या कंपन्या म्हणजे अॅपल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन आणि अल्फाबेट या कंपन्यांच्या व्हॅल्यू ही कोरोनाच्या काळात दुप्पट झाली आहे. या चारही कंपन्यांचा व्हॅल्यूमध्ये कोरोना काळात जवळपास तीन अब्ज कोटी रुपयांची भर पडून ती सहा अब्ज कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ह्युरनच्या या लिस्टमध्ये या चार कंपन्यांचा वाटा हा 14 टक्के इतका आहे. 


Hurun Global 500 या यादीमध्ये अमेरिकेच्या 243, चीनच्या 47, जपानच्या 30 कंपन्यांचा समावेश आहे. तर भारताच्या 12 कंपन्यांचा समावेश आहे. या यादीत समावेश होण्यासाठी कंपनीची व्हॅल्यू ही 3660 कोटी डॉलर्स म्हणजे 2.72 लाख कोटी रुपयांचा कट ऑफ ठेवण्यात आला आहे. 


भारतीय कंपन्यांत रिलायन्स टॉपला
या यादीत 12 भारतीय कंपन्यांचा समावेश झाला असून त्यामध्ये रिलायन्स सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. रिलायन्स आणि टीसीएस या कंपन्या टॉप 100 मध्ये आहेत. रिलायन्सच्या व्हॅल्यूमध्ये या वर्षी 11 टक्क्यांची वाढ झाली असून ती 19.98 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. ह्युरनच्या या यादीत रिलायन्स 57 व्या स्थानावर आहे. त्यानंतर टीसीएसचा नंबर लागत असून त्याच्या व्हॅल्यूमध्ये 18 टक्क्यांची वाढ होऊन ती 12.2 लाख कोटी रुपये इतकी झाली आहे. 


एचडीएफसीच्या व्हॅल्यू मध्ये 11.3 टक्के वाढ झाली असून ती 8.40 लाख कोटी इतकी झाली आहे. या यादीत विप्रो, एशियन पेन्ट्स, एचसीएस टेक्नॉलॉजी या कंपन्यांचाही समावेश आहे. गेल्या वर्षी टॉप 500 च्या या यादीत असणाऱ्या 48 कंपन्या या वर्षी यादीतून बाहेर पडल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या :