मुंबई : भारतीय जवानांना मारल्या जाणाऱ्या प्रत्येक थप्पडीच्या बदल्यात 100 जिहादींना ठार मारा, अशा शब्दात टीम इंडियाचा क्रिकेटर गौतम गंभीरने संताप व्यक्त केला आहे.

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या जवानांना जमावाकडून मारहाण होत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर गौतम गंभीरचा संताप अनावर झाला. त्याने ट्वीटरवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या.

श्रीनगरमध्ये रस्त्यावर शांतपणे चालत असलेल्या सीआरपीएफच्या जवानांना छेडतानाचा तसंच मारहाण करत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जवानांना मिळणारी वागणूक पाहता कोणत्याही भारतीयाला संताप अनावर झाल्याशिवाय राहत नाही.

आझादी हवी आहे त्यांनी आताच देश सोडून चालतं व्हा. काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं, अशा तीव्र शब्दात गंभीरने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

https://twitter.com/GautamGambhir/status/852429826795249664

पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तावरुन परतणाऱ्या सीआरपीएफ जवानांना काही टवाळखोर फुटीरतावाद्यांनी चक्क लाथा-बुक्यांनी मारल्याचं व्हिडीओत स्पष्ट दिसतं आहे.

विशेष म्हणजे एवढा अपमान सहन करुनही हातात एके-47 असलेले देशाचे रक्षणकर्ते शांत आहेत. ते कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर देत नाहीत. कारण दुश्मानाच्या नरडीचा घोट घेणाऱ्या जवानांना देशातील नागरिकांना हात न लावण्याची शिकवण दिली जाते. फुटीरतवाद्यांसाठी हेच खरं चोख प्रत्युत्तर आहे.

पाहा व्हिडिओ :