मुंबई: झोमॅटो  (Zomato) आणि स्विगी (Swiggy) या फूड डिलिव्हरी अॅपवरुन आज अनेकांना खाद्यपदार्थांची ऑर्डर देताना अडचणी आल्या. या दोन्ही अॅपमध्ये काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे ही सर्विस कोलंडल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांकडे तक्रारीचा पाऊस पडल्याचं दिसून येतंय.

Continues below advertisement

आज दुपारच्या दरम्यान, या दोन्ही अॅपमध्ये ही अडचण आली असल्याचं अनेक यूजर्सनी सांगितलं आहे. यामध्ये यूजर्सचे पैसे कट होतायत पण ऑर्डर प्लेस होत नसल्याचं समोर येतंय. त्यामुळे अनेक यूजर्स हैराण झाले आहेत. त्यांनी आपल्या तक्रारी या दोन्ही कंपन्यांच्या वेब साईटवर आणि सोशल मीडियावर मांडल्या आहेत. 10 मिनीटांच्या आत फूड डिलिव्हरी देण्याची घोषणा करणाऱ्या झोमॅटोवर आता यूजर्सकडून कमेंटचा पाऊस पडतोय. 

आमच्याकडे काही तांत्रिक कारणांमुळे फूड ऑर्डर प्लेस करण्यामध्ये  काही अडचणी येत आहेत, पण ही सेवा लवकरात लवकर सुरळीत केली जाईल असं झोमॅटोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

 

यूजर्सनी आपल्याकडून पैसे कट होतायत पण त्याची ऑर्डर प्लेस होत नसल्याच्या तक्रारी करत स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -

 

ABP Majha