नवी दिल्ली : देशातल्या 5 राज्यांना पुराचा जोरदार तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, बिहार, मध्यप्रदेश, गुजरातमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल 50 हजार लोकांना पुराचा तडाखा बसला आहे.


 

पंतप्रधान मोदींच्या वाराणसीमध्ये गंगा नदीनं रौद्र रूप धारण केलं आहे. गंगाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाराणसीत 3 दिवस शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

 

गंगा नदीची पाणीपातळी प्रत्येक तासाला वाढते आहे. इलाहाबादमध्ये यमुनेच्या पाण्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले आहेत. लोक सामान घेऊन घराबाहेर पडत आहेत.

 

बिहारमध्ये परिस्थिती सर्वात जास्त खराब आहे. बिहारमध्ये 10 लाखांहून अधिक लोक पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. छपरा जिल्हा गंगा, गंडक, सरयू नदीनं वेढला असल्यानं तिन्ही नद्यांचं पाणी जिल्ह्यात शिरलं आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांनी मदतीसाठी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली. मोदींनी नितिश कुमारांना मदतीचं आश्वासन दिलं आहे.