मुंबई :  राज्यात अनेक नेतेमंडळी ईडीच्या रडारवर असताना आता (Enforcement Directorate) देशातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी रडारवर आलीय. फ्लिपकार्ट (Flipkart) आणि त्याचे संस्थापक सचिन बंसल Bansal) आणि बिन्नी बंसल (Binny Bansal) यांना 10 हजार कोटी रुपये दंड लावला जाईल असा इशारा दिला आहे. फ्लिपकार्टच्या संस्थापकांवर परदेशी गुंतवणूक कायद्याचं (Foreign Investment Laws)   उल्लंघन केल्याचा आरोप आहे. 


एका रिपोर्टनुसार  ईडीनं फ्लिपकार्ट आणि त्याचे संस्थापक बंसल बंधूंना कारणे दाखवा नोटीस जारी केलं आहे. त्यांच्याकडे ईडीच्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी 90 दिवसांचा अवधी आहे. 


फ्लिपकार्टमधील डिलिव्हरी बॉयची करामत, कंपनीलाच लावला 8 लाखाचा चुना, नवी मुंबईत अटक


माहितीनुसार सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडी ई-कॉमर्समधील कंपन्या असलेल्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉन.डॉट इंक या कंपन्यांच्या परदेशी गुंतवणूक कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी काही वर्षापासून चौकशी करत आहे. माहिती अशी मिळाली आहे की, फ्लिपकार्टनं परदेशी गुंतवणूक कायद्याचं उल्लंघन केलं आहे.  


कस काय! फ्लिपकार्टची मराठीजनांना साद, अॅप आता मराठीतही उपलब्ध


कारण दाखवा नोटीस जारी
चेन्नई एजेंसी कार्यालयाकडून फ्लिपकार्ट कंपनीला एक कारण दाखवा नोटीस जुलैच्या सुरुवातीला जारी केली आहे. फ्लिपकार्ट तसेच संस्थापक सचिन बंसल आणि बिन्नी बंसलसह गुंतवणूकदार टायगर ग्लोबल (Tiger Global) यांना त्यांच्यावर 10,000 कोटींचा दंड का आकारला जाऊ नये यासाठी ही नोटीस बजावली आहे.  


फ्लिपकार्टच्या मते नागालँड भारताच्या 'बाहेरचा प्रदेश', देशभरातून झालेल्या टीकेनंतर मागितली माफी


वॉलमार्टकडून फ्लिपकार्ट कंपनी शेअर्स खरेदी
'वॉलमार्ट' या अमेरिकन रिटेलर कंपनीने 2018 साली फ्लिपकार्ट कंपनीमधील 16  अब्ज डॉलर देत हिस्सेदारी अर्थात 40 टक्के शेअर्स खरेदी केले होते. सचिन बंसल यांनी त्यावेळी आपला हिस्सा वॉलमार्टला विकला होता.  ई-कॉमर्स क्षेत्रातील अलिकडच्या काळातील हा सर्वात मोठा व्यवहार ठरला होता.  जुलै महिन्यात 3.6 बिलियन डॉलरच्या फंडिंग राऊंडनंतर  फ्लिपकार्टचं व्हॅल्युएशन तीन वर्षाच्या आत दुप्पट म्हणजे 37.6 बिलियन डॉलर झालं होतं.