VIDEO : दोन ट्रकच्या मध्ये सापडलेल्या कारचा चेंदामेंदा
एबीपी माझा वेब टीम | 25 May 2016 10:47 AM (IST)
हैदराबाद : तेलंगणाच्या निजामाबाद जिल्ह्यातील कमरेड्डी मंडलमध्ये दोन ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. दोन्ही ट्रकच्या मध्ये कार सापडल्याने तिचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. या अपघातात 17 वर्षीय मुलीसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. कमरेड्डी बायपासवर आज सकाळी 8.30 च्या सुमारास हा अपघात झाला. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रकच्या मध्ये कार अडकली. यावेळी नागरिकांसह कारचा चक्काचूर झाला. गाडीमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. तर अपघातात एका ट्रक चालक जखमी झाला आहे. पुढील तपास सुरु आहे. पाहा व्हिडीओ