लखनऊ : अयोध्येत बजरंग दलाने आयोजित केलेला शस्त्र प्रशिक्षणाचा कार्यक्रम वादात अडकला आहे. या कार्यक्रमात बजरंग दलानं प्रतिस्पर्धींना मुस्लिम वेशात दाखवलं होतं. यामुळे विशिष्ट समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


 

महत्वाचं म्हणजे राज्यपाल राम नाईक यांनी अशा प्रकारच्या शस्त्र प्रशिक्षण कार्यक्रमांचं समर्थन केल्यानं हा वाद आधीच चर्चेत होता.

 

आता अयोध्येनंतर बजरंग दल हा कार्यक्रम इतर ठिकाणी आयोजित करणार आहे. अर्थात उत्तर प्रदेश निवडणूक जवळ आलेली असताना केवळ मतांच्या ध्रुवीकरणासाठी हे प्रयत्न होत आहेत का, अशीही चर्चा रंगली आहे.

 

बजरंग दलाने स्वरक्षण आणि शस्त्र प्रशिक्षणासाठी 14 मे रोजी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. मात्र सामाजिक सौहार्दाला ठेच पोहोचवण्याचा प्रयत्न आणि विशिष्ट धर्माच्या भावना दुखावल्यामुळे, आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.