मुंबई : देशातील पाच मोठ्या बँकांचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण करण्यास केंद्राने मंजुरी दिली आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
प्रस्तावित पाच बँकांमध्ये स्टेट बँक बिकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पटियाला , स्टेट बँक ऑफ मैसूर आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या बँकांचे आता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरणं करण्यात येणार आहे. याशिवाय भारतीय महिला बँकदेखील यापुढे स्टेट बँक ऑफ इंडियाचाच भाग असणार आहे.
केंद्राच्या या निर्णयामुळं स्टेट बँक आणि विलीनकरण होणाऱ्या बँकांचा मोठा फायदा होणार असल्याचं मत अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. पण दुसरीकडे विलीनीकरणाच्या बातमीनंतर या बँकांच्या शेअरमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं.