नवी दिल्ली : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची वैयक्तिक माहिती माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून लीक झाली. आधार कार्डच्या प्रमोशन कार्यक्रमात हा प्रकार घडला. त्यानंतर धोनीची पत्नी साक्षीने माहिती आणि प्रसारण मंत्री रवीशंकर प्रसाद यांच्यावरच निशाणा साधला.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्विटर हँडलवरुन धोनीच्या आधार कार्डची कॉपी ट्वीट करण्यात आली. त्यानंतर प्रायव्हसी नावाचा काही प्रकार आहे का, असा सवाल साक्षीने रवीशंकर प्रसाद यांना केला.
https://twitter.com/rsprasad/status/846724496694231041
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे लोक धोनीच्या घरी जाऊन, तो आधार कार्डचा वापर कसा करतो, त्याची माहिती अपडेट करत होते. अशाच एका ट्वीटमध्ये धोनीचा आधार कार्ड फॉर्म प्रसिद्ध करण्यात आला. ज्यावर साक्षीने आक्षेप घेतला.
https://twitter.com/SaakshiSRawat/status/846730178902446084
साक्षीच्या ट्वीटला रवीशंकर प्रसाद यांनीही तातडीने उत्तर दिलं. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या ट्वीटमधून काही वैयक्तिक माहिती लीक झाली आहे का, असं रवीशंकर प्रसाद यांनी विचारलं.
https://twitter.com/SaakshiSRawat/status/846738474011013120
आधार कार्ड फॉर्ममध्ये वैयक्तीक माहिती भरलेली आहे. तो फॉर्म अपलोड करण्यात आलाय, असं ट्वीट साक्षीने केलं.
रवीशंकर प्रसाद यांनी याची तातडीने दखल घेत ट्वीट हटवण्यास सांगितलं. शिवाय हा प्रकार करणाऱ्याविरोधात कारवाई करण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.