नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या  लाटेचा सामना करण्यासाठी आता भारताला ब्रिटनची साथ मिळत असून ब्रिटनने 100 व्हेन्टिलेटर आणि 95 ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटरची मदत पोहोच केली आहे. ब्रिटनकडून करण्यात येत असलेल्या मदतीचा हा पहिला टप्पा असून अजून मोठी मदत लवकरच भारतात येणार असल्याचं ब्रिटनकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 


 






कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी ब्रिटन हा 'एक मित्र आणि साथी' च्या रूपात भारतासोबत आहे असंही ब्रिटनने स्पष्ट केलं आहे. ब्रिटनने भारताला 600 हून अधिक महत्वाचे साहित्य पाठवण्याचे आश्वासन दिलं आहे. 


 






ब्रिटन हा भारताचा 'मित्र आणि साथी'
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, भारतावर आलेल्या या संकटाचा सामना करण्यासाठी त्या देशाला मदत म्हणून शेकडो व्हेन्टिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सनस्ट्रेटर भारतात पाठवण्यात येणार आहेत. ब्रिटन या काळात भारताचा 'एक मित्र आणि साथी' म्हणून काम करेल. 


गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या तीन लाख 23 हजार 144 नव्या रुग्णांची भर पडली तर 2771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 28 लाख 82 हजार 204 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात दोन लाख 51 हजार 827 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


महत्वाच्या बातम्या :