Coronavirus India: देशात अनेक राज्यांची लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यु सारख्या पर्यायांचा वापर सुरू केला असला तरी कोरोनाची रुग्णसंख्या काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या तीन लाख 23 हजार 144 नव्या रुग्णांची भर पडली तर 2771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती 28 लाख 82 हजार 204 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात दोन लाख 51 हजार 827 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 


देशातील आजची कोरोना स्थिती :  


एकूण कोरोनाबाधित रुग्ण : एक कोटी 76 लाख 36 हजार 307


एकूण मृत्यू : एक लाख 97 हजार 894


एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 45 लाख 56 हजार 209


एकूण अॅक्टिव्ह रुग्ण : 28 लाख 82 हजार 204


देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 14 कोटी 50 लाख 85 हजार 911 डोस 


सोमवारी करण्यात आलेल्या चाचण्या : 16 लाख 58 हजार 700


ICMR ने सांगितलं की सोमवारपर्यंत देशात कोरोनाच्या एकूण 28 कोटी नऊ लाख 79 हजार 877 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्यामध्ये सोमवारी एकाच दिवसात 16 लाख 58 हजार 700 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. 


महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्णसंख्या
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदवस वाढत आहे.  राज्यात आज  48 हजार 700 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज 71 हजार 736 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 36 लाख 01 हजार 796 रुग्ण बरे होऊन  घरी परतले आहेत.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 82.92 टक्के  झाले आहे. राज्यात एकूण 36 लाख 98 हजार 354 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


राज्यात आज एकूण 524 रुग्णांचा आज मृत्यू झाला आहे. सध्या मृत्यूदर 1.05 टक्के आहे. आतापर्यंत एकूण 65 हजार 284 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या 524 मृत्यूंपैकी 293 मृत्यू मागील 48 तासातील आहेत. तर 116 मृत्यू मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित 115मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीतील आहेत. 


महत्वाच्या बातम्या :