अलाहाबाद : अलाहाबादमध्ये एका साखरपुड्याच्या समारंभात अचानक गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये एका पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. ज्यावेळी नवऱ्या मुलीने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घातली त्याचवेळी अचानक गोळीबार करण्यात आला. ही घटना अलाहाबादमधील रंगपुरा या गावात घडली.
हा गोळीबार जाणूनबुजून करण्यात आला की चुकून झाला? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समजू शकलेली नाही. मात्र, मुलीच्या कुटुंबीयांचा असा दावा केला आहे की, साखरपुड्याचा सोहळा पूर्ण झाल्याच्या आनंदात गोळीबार करण्यात आला. पण यावेळी निशाणा चुकल्याने ही दुर्घटना घडली.
मात्र वरपक्षाचा असा आरोप आहे की, नवरदेवावर निशाणा साधून हा गोळीबार करण्यात आला होता. एकदा नाही तर यावेळी तीन राऊंड फायर करण्यात आले. दरम्यान, गोळीबार करणारी व्यक्ती फरार झाली आहे. दुसरीकडे अशीही चर्चा सुरु आहे की, गोळीबार करणारा व्यक्ती हा या लग्नामुळे नाराज होता. त्याला कोणत्याही किंमतीवर हे लग्न मोडून नवऱ्या मुलीशी लग्न करायचं होतं. त्यामुळे त्याने हा गोळीबार केला.
दरम्यान, याप्रकरणी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचा पोलीस सध्या कसून शोध घेत आहेत.
वधूने वरमाला गळ्यात घालताच गोळीबार, चिमुकल्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Apr 2018 11:26 AM (IST)
अलाहाबादमध्ये एका साखरपुड्याच्या समारंभात अचानक गोळीबार करण्यात आला. ज्यामध्ये एका पाच वर्षाच्या मुलाच्या मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -