नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवसस्थानाजवळ आग लागल्याची माहिती मिळत असून शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजत आहे. हाती आलेल्या वृत्तानुसार, दिल्लीतील 7 लोककल्याण मार्ग येथील नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाजवळ असलेल्या लोक कल्याण मार्ग कॉम्प्लेक्सच्या एसपीजी रिसेप्शन भागात संध्याकाळी 7 वाजून 25 मिनिटांच्या सुमारास ही आग लागली होती. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.


आगीच्या वृत्ताबाबत माहिती देताना पंतप्रधान कार्यालय (PMO) यांनी यासंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्वीटमध्ये त्यांनी सांगितले की, 9 लोक कल्याण मार्गावर शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. आग पंतप्रधानांचं निवासस्थान किंवा कार्यालयाजवळ लागली नाही. आग लोक कल्याण मार्ग कॉम्पलेक्स एसपीजी रिसेप्शन भागात लागली आहे. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. आग लागल्याची सूचना 7 वाजून 25 मिनिटांनी मिळाली होती. त्यानंतर त्वरित घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 9 गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या.


आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पंतप्रधानांच्या निवासस्थानी आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमनचे ९ बंब दाखल झाले आहेत. तर ४ अॅम्ब्युलन्सही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग गंभीर स्वरुपाची नसली तरी सुरक्षेच्या दृष्टीने सर्व महत्वाची काळजी घेण्यात आली आहे.

दरम्यान, आग लागल्यानंतर '7 लोककल्याण मार्ग' येथील रस्ता बंद करण्यात आला होता. आगीचे स्वरूप मोठे नसून अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. तसेच ही आग पंतप्रधानांच्या निवास्थानी किंवा कार्यालयात आग लागली नसल्याचे पीएमओ कार्यालयाने स्पष्ट केलं आहे.