नवी दिल्ली : भारताच्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदावर लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ आहेत. बिपिन रावत मंगळवारी (31 डिसेंबर) लष्करप्रमुख पदावरुन निवृत्त होत आहेत. सामाजिक न्याय मंत्री कृष्णपाल गुर्जन यांनी ही माहिती दिली. स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषणा केली होती. संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचे मोदींनी सांगितले होते. केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री राम विलास पासवान यांनी देखील रावत यांना शुभेच्छा दिल्या.
बिपीन रावत मंगळवारी (31 डिसेंबर) निवृत्त होणार आहे आणि याच दिवशी त्यांना नवीन पदाचा कार्यभार सांभळणार आहे. केंद्र सरकारने चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या कार्यकालामध्ये तीन वर्षांनी वाढ करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. त्यामुळे आता या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीचा कार्यकाळ हा 62 ऐवजी 65 वर्षे एवढा असणार आहे.
संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी आणि तिन्ही दलांमध्ये योग्य समन्वय आखण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद निर्माण करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात मंजुरी दिली होती. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर सैन्य दलांमध्ये योग्य समन्वय राखला जावा यासाठी असा प्रकारचे पद निर्माण करण्याची शिफारस करण्यात आली होती. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ सैनिकी मोहिमेदरम्यान तिन्ही दलांमध्ये समन्वय राखण्याचे काम करेल.
सीडीएस स्टार जनरल असेल आणि सैन्य व्यवहार विभागाचे सचिव म्हणून काम करेल. केंद्र सरकारने हे स्पष्ट केले की, सीडीएस थेट सेना, वायु सेना आणि नौदलाच्या कमांड आणि युनिट्सवर नियंत्रण ठेवणार नाही. परंतु त्या अंतर्गत सैन्याच्या तीन भागाची समान कमांड व विभागणी होईल.
सध्या अंदमान निकोबार कमांड ही ट्राय सेवा कमांड आहे जी आता सीडीएस अंतर्गत काम करेल. याव्यतिरिक्त, स्पेशल ऑपरेशन्स फोर्सेस विभाग (आर्मर्ड फोर्सेस स्पेशल ऑपरेशन्स विभाग) आणि डिफेन्स सायबर एजन्सीसह स्पेस सायबर एजन्सी आता सीडीएस अंतर्गत काम करतील.
बिपीन रावत भारताचे पहिले 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ'
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
30 Dec 2019 04:53 PM (IST)
बिपीन रावत मंगळवारी (31 डिसेंबर) निवृत्त होणार आहे आणि याच दिवशी त्यांना नवीन पदाचा कार्यभार सांभळणार आहे. संरक्षण दलांना बळकटी देण्यासाठी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पद तयार करण्यात येणार असल्याचे मोदींनी सांगितले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -