नवी दिल्ली :  दिल्लीतल्या महाराष्ट्र महाराष्ट्र सदनामध्ये (Maharashtra Sadan Fire )आज सकाळी नऊच्या सुमारास आग लागली. सदनामध्ये राज्यपालांसाठी आरक्षित असलेल्या कक्षामध्ये ही आग लागली.. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.. आग लागल्यानंतर काही काळ सदनामध्ये धुराचे साम्राज्य होतं. अग्निशमन दलाच्या चार गाड्या या ठिकाणी बोलावण्यात आल्या पण त्या आधीच सदनामधल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी अग्नीरोधक यंत्रणेच्या सहाय्याने ही आग आटोक्यात आणल्याची माहिती आहे. दिल्लीतल्या सहा एकर परिसरात वसलेल्या अलिशान महाराष्ट्र सदनमध्ये मुख्यमंत्री आणि राज्यपालांसाठी दोन प्रमुख कक्ष आरक्षित आहेत.