मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तिची वक्तव्य आणि ट्वीट्समुळे चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा कंगना रनौत चर्चेत आली आहे. कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यात अभिनेत्री कंगना रनौत हिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी कोर्टाने कंगनाविरोधात एका ट्वीटसंदर्भात एफआयआर नोंदविण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.


तुमकूरूच्या प्रथम-वर्ग न्यायिक दंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयाने वकील रमेश नाईक यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे क्याथासंदरा पोलिस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकाला कंगना रनौतविरूद्ध एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिले. कोर्टाने म्हटलं की, तक्रारदाराने सीआरपीसीच्या कलम 166 (3) अन्वये तक्रार दाखल केली आहे.


#KanganaAwardWapasKar ट्वीटर वर ट्रेंड! कंगना म्हणते.. मी क्षत्रिय, प्राण जाए पर वचन ना जाए!


काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी विधेयकासंदर्भात एक ट्वीट केले होते. कंगनाने हे ट्वीट रिट्वीट करत म्हटलं होतं की, "पंतप्रधानजी, झोपलेला माणूस असेल तर त्याला जागं करता येतं. ज्याला गैरसमज आहे त्याला समजवलं जाऊ शकतं. मात्र झोपेचं सोंग घेतलेलं, न समजण्याचं नाटक करणाऱ्यांना तुम्ही कितीही समजावलं तरी फरक पडणार आहे का? हे तेच दहशतवादी आहेत. सीएएने (सुधारित नागरिकत्व कायदा) एकाही व्यक्तीचं नागरिकत्व गेलं नाही, परंतु त्यांनी रक्ताच्या नद्यांचे वाहिल्या.





रमेश नाईक यांनी म्हटलं की, कंगनाच्या ट्वीटमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यानंतर त्यांनी कंगनाविरोधात एफआयआर नोंदवण्याचा निर्णय घेतला.