गोवा : पुढील महिन्यापासून गोव्यामध्ये कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारु पिताना किंवा घाण करताना आढळल्यास त्याच्यांवर दंड आकारला जाणार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी ही घोषणा केली आहे.


गोवा सरकार याबाबतची सविस्तर सूचना लवकरच काढणार आहे. सार्वजनिक ठिकाणी दारु पिताना आढळल्यास त्याच्यावर 2500 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो.


“जर कोणी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारु पिताना आढळल्यास ऑगस्ट महिन्यापासून त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. जवळपास 2500 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. लवकरच त्यासाठीची सूचना गोवा सरकार काढणार आहे. ऑगस्ट महिन्याआधीच हे करण्याची माझी इच्छा आहे. जेणेकरून 15 ऑगस्टपासून कारवाईला सुरूवात करता येईल. तसेच सार्वजनिक ठिकाणी घाण करताना कोणी आढळल्यास त्याच्यावरही कारवाई केली जाईल”, असे मनोहर पर्रिकर यांनी म्हटले आहे.