लखनौ : उत्तर प्रदेशातील एका न्यायालयाने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद (Salman Khurshid) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. सलमान खुर्शीद यांनी त्यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना ही आयसीस आणि बोको हराम यासारख्या दहशतवादी गटांसोबत केली होती. 


लखनौच्या एका न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु असताना हा आदेश देण्यात आला आहे. शुभांगी तिवारी यांनी सलमान खुर्शीद यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झालाय. ‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या खुर्शीदांच्या नव्या पुस्तकातील हिंदुत्वाच्या तुलनेमुळे खुर्शीद वादात सापडलेत. खुर्शीद यांनी हिंदुत्वाची तुलना आयसिस, बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केल्यामुळे भाजपाकडून जोरदार आक्षेप घेण्यात आला आहे.


हिंदुत्वाबद्दल नेमकं काय लिहिलंय? 
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या‘सनराईज ओव्हर अयोध्या: नेशनहूड इन अवर टाईम्स’ या पुस्तकाचं प्रकाशन बुधवारी झालं. त्यावरुन आता देशात मोठा वाद सुरु झालाय. या पुस्तकात हिंदूत्वाबद्दल असं लिहिण्यात आलं आहे की, 'ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारलं गेलं आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखंच आहे.'


खुर्शीद यांच्या 300 पानांच्या पुस्तकांमध्ये हिंदू धर्माविषयी हा उल्लेख आला असल्याने आता हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप आक्रमक झालं आहेत. हिंदुत्वाचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपनं खुर्शीदांविरोधात तक्रार केली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :