Punjab Blast : पंजाबमधील लुधियाना जिल्हा न्यायालयात स्फोट झाला आहे. या स्फोटात दोन जण मृत्यूमुखी पडल्याची माहिती मिळत आहे. तसेच अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला. मात्र, अद्याप हा स्फोट कसा झाला? तसेच यासाठी जबाबदार कोण? यासंदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्फोट इतका मोठा होता की, त्याचा परिणाम आजूबाजूच्या इमारतींवरही दिसत होता. लुधियाना जिल्हा न्यायालय संकुलाच्या सहा मजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर हा स्फोट झाला. लुधियाना जिल्हा न्यायालयातील दुसऱ्या मजल्यावरील बाथरुममध्ये स्फोट झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, आज वकिलांच्या संपामुळे न्यायालयात फारसं कुणी उपस्थित नव्हतं. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. तसेच आर्थिक नुकसानही फारसं झालेलं नाही. 



लुधियानाचे पोलीस कमिश्नर गुरप्रीत सिंह भुलर म्हणाले की, "या घटनेचा तपास सुरु आहे. गा स्फोट न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरुममध्ये झाला आहे. बाथरुमच्या बाजूलाच रेकॉर्ड रुम होती."


काही मीडिया रिपोर्ट्समध्ये न्यायालय कॉम्प्लेक्समध्ये उपस्थित वकील न्यायालयात झालेला स्फोट हा बॉम्बस्फोट असल्याचा दावा करत आहे. मात्र, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले असून सध्या संपूर्ण परिसराची चौकशी सुरु आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :  



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह