भाजप मंत्री आणि खासदार स्टेजवरच भिडले, व्हिडिओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 15 Jun 2017 01:40 PM (IST)
भोपाळ : मध्य प्रदेशचे कृषी मंत्री गौरीशंकर बिसेन आणि खासदार बोधसिंह भगत हे एका कार्यक्रमादरम्यान स्टेजवरच भिडले. मध्य प्रदेशातील बालाघाट येथे बुधवारी ‘सबका साथ, सबका विकास’ या कार्यक्रमादरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाला. कार्यक्रमादरम्यान एक शेतकरी त्याची समस्या सांगण्यासाठी उभा राहिला, ज्याला कृषीमंत्र्यांनी विरोध केला. यामुळे खासदारांचा पारा चढला आणि त्यांनी कृषीमंत्र्यांना सुनावलं. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. उपस्थित कार्यकर्त्यांनी दोघांना दूर नेलं. खासदार बोधसिंह भगत यांना या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं. या कार्यक्रमातच दोन्ही नेते भिडल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाहा व्हिडिओ :