तिरुपती : तिरुपतीतील प्रसिद्ध बालाजी मंदिरातून बाळ चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तिरुमालातील व्यंकटेश्वर मंदिर कॉम्प्लेक्ससमोरील मोकळ्या मैदानावर जोडपं झोपलेलं असताना त्यांचा नऊ महिन्यांचा मुलगा पळवण्यात आला.


देवदर्शनानंतर संबंधित जोडपं चार मुलांसह मोकळ्या जागेवर झोपलं होतं. बुधवारी सकाळच्या सुमारास त्यांचं बाळ पळवल्याचं उघडकीस आलं. जोडप्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता एका जोडप्याने बाळ चोरल्याचं समोर आलं.

बाळचोरी करणाऱ्या आरोपी जोडप्याचे फोटो आणि सीसीटीव्ही फुटेज जारी करण्यात आले आहेत. त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी युद्धपातळीवर सुरु केला आहे.

यावर्षी जानेवारी महिन्यात याच परिसरातून चार वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण करण्यात आलं होतं. तेलंगणातील एका बसमधून काही प्रवाशांनी तिची सुटका केली होती.