मकर संक्रातीनिमित्त मथुरेत श्रीकृष्ण दर्शनासाठी मोठी गर्दी होते. यानिमित्त इथं आलेले अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने अनेक वस्तू, पूजेचं साहित्य यमुनेत अर्पण करतात.
पण अर्पण केलेल्या वस्तूंवर हक्क कुणाचा यावरुन स्थानिक आणि पुजाऱ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामुळे पुजाऱ्यांच्या या कृतीवरुन प्रश्न उपस्थित होत आहेत.
या हाणामारीनंतर परिसरात एकच गोंधळ उडला. यात चेंगराचेंगरी होत असल्याने, गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनाही काही काळ सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
दरम्यान, पुजारी आणि स्थानिकांच्या मारहाणीच्या घटना यापूर्वी देखील झाल्या आहेत. पूजेच्या नावावर इथले पुजारी मनमानी करत, भक्तांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल करतात, असा स्थानिकांचा आरोप आहे.
विशेष म्हणजे, याला कुणीही विरोध केला, तर पुजारी मारझोडीवर उतरतात असाही आरोप स्थानिकांकडून केला जातो.
व्हिडीओ पाहा