पणजी : जपानमध्ये खोल समुद्रात 'डायमंड प्रिन्सेस' या जहाजावर अडकलेल्या 50 गोमंतकीय खलाशांना इंडियन एअरलाईन्सच्या खास विमानाने भारतात आणले जात असल्याची माहिती अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी दिली आहे. यापूर्वी कोरोनाची औषधं घेऊन चीनमध्ये गेलंलं एक विमान वुहान येथून 119 भारतीय नागरिकांना घेऊन आज परतले आहे.


या जहाजावरील खलाशांपैकी 14 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ज्यांना कोरोना व्हायरसची लागण झाली, त्यांना दिल्ली विमानतळावर आणल्यानंतर वैद्यकीय उपचारासाठी दाखल केले जाणार आहे. किमान पुढील 20 ते 25 दिवस त्यांना देखरेखीखाली ठेवले जाणार आहे. नंतरच त्यांना आपल्या राज्यात जाऊ दिले जाणार असल्याची माहिती सावईकर यांनी दिली आहे.

डायमंड प्रिन्सेस या जहाजावर 124 भारतीय खलाशी अडकले आहेत. त्यात 50 गोमंतकीय असल्याची माहिती मिळताच अनिवासी भारतीय आयुक्त नरेंद्र सावईकर यांनी केंद्रीय विदेश व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर तसेच जपानमधील भारतीय राजदूत संजय कुमार शर्मा यांच्याशी संपर्क साधून त्यांना मायदेशात आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांच्या प्रयत्नाना यश आले असून काल बुधवारी खास विमानाने हे खलाशी मायदेशी निघाले आहेत. या जहाजावर असलेल्या धनस्थ रायकर या गोमंतकीय खलाशाने विमानात बसल्या नंतरचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत आनंद व्यक्त केला आहे. सावईकर यांनी या खलाशांना मायदेशी आणण्यात पूर्ण सहकार्य केल्याने केंद्रीय विदेश व्यवहारमंत्री डॉ. एस. जयशंकर व जपानमधील भारतीय राजदूत संजय कुमार शर्मा यांचे आभार मानले आहेत.

Corona Virus | कोरोनाग्रस्त चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं, मित्र देशाच्या 5 नागरिकांचाही समावेश

चीनमधून 119 भारतीयांना घेऊन विमान परतलं -
चीनच्या वुहान प्रांतातून 119 भारतीय आणि पाच परदेशी नागरिकांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान दिल्लीला परतले आहे. चीनला 15 टन साहित्य घेऊन हे विमान बुधवारी रवाना झाले होते. गेल्या 28 दिवसांत कोरोना विषाणू बाधित भागातून भारताने 850​​हून अधिक नागरिकांना सुरक्षित भारतात आणले आहे. भारताने मित्र देशांच्याही 45 हून अधिक नागरिकांना बाहेर काढले आहे.

Corona | कोरोना विषयी सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार | ABP Majha