महत्त्वाचं म्हणजे बलात्कार करणारा आरोपीही अल्पवयीन असल्याने जुवेनाईल कोर्ट अर्थात बाल गुन्हेगारी न्यायालयाने त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावली.
याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी आरोपपत्र (चार्जशीट) दाखल केलं होतं. त्यानंतर न्यायालयानेही त्याचदिवशी म्हणजे काल शिक्षेचीही सुनावणी केली. देशातील हा बलात्काराचा सर्वात सुपरफास्ट निकाल असल्याचं म्हटलं जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी स्वातंत्र्य दिनी म्हणजे 15 ऑगस्ट रोजी मुलीला शेजारच्या 14 वर्षीय मुलासोबत खेळण्यास पाठवलं होतं. शेजारचाच मुलगा असल्याने मुलीला त्याच्यासोबत जाऊ देऊन, कुटुंबीय कामाला गेले. मात्र त्याच दिवशी आरोपीने मुलीवर बलात्कार केला.
उज्जैनचे पोलीस अधीक्षक सचिन अतुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलात्कारानंतर आरोपी गाव सोडून पळून गेला होता. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्टला त्याला एका नातेवाईकाच्या घरातून पकडलं होतं.
पोलिसांनी तातडीने तपास केला. चार दिवसांच्या आत पोलिसांनी तपास पूर्ण करत, सोमवारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. न्यायाधीश तृप्ती पांडे यांनी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काही तासातच निर्णय दिला. दोषी अल्पवयीन आरोपीची दोन वर्षांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली.
या प्रकरणातही तातडीने शिक्षा
- 8 ऑगस्ट रोजी मध्य प्रदेशातील दतिया येथील एका न्यायालयानेही चिमुकलीवर बलात्कार करणाऱ्याला, 3 दिवसांच्या सुनावणीनंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
- छतरपूर जिल्ह्यातही स्थानिक न्यायालयाने, दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. ही सुनावणी 27 दिवस चालली होती.
- 8 जुलैला मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात 46 दिवसांच्या सुनावणीनंतर बलात्काऱ्याला शिक्षा सुनावण्यात आली.
संबंधित बातम्या